शेन वॉर्नला सिगारेटचा फटका
अष्टपैलू खेळाडू शेन वॉर्न सिगारेट ओढण्याच्या एका नवीन वादात अडकण्याची दाट शक्यता आहे. आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न सामना सुरू असताना सिगारेट ओढत होता.
या घटनेचा गोव्याच्या 'नोट' या स्वयंसेवी संस्थेने निषेध व्यक्त केला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून त्यातून आयपीएलचीदेखील सुटका नाही, असे नोटने आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी लिहलेल्या एका पत्रात म्हटले आहे.
सिगारेटच्या माध्यमातून वॉर्न उत्तेजक द्रव्यही घेत असावा असा संशय देखील नोटने व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाची लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी सुपरस्टार शाहरूख खानलाही मैदानावर सिगारेट ओढण्यासंबंधी नोटीस बजाविण्यात आली आली आहे.