मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 22 मे 2013 (15:46 IST)

स्पॉट फिक्सिंग: आयपीएल संघाचा मालकही येणार गोत्यात

FILE
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिस बीसीसीआयचे अध्यक्ष व चेन्नई संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या जावयाची चौकशी करणार असल्याचे समजते. याप्रकरणात मंगळवारी अटक झालेला विंदू दारा सिंह गुरूनाथ मेयप्पन यांच्या सतत संपर्कात होता, असे स्पष्ट झाले आहे.

यामुळे आयपीएल संघाचा मालकही गोत्यात येण्याची शक्यता आहे. मेयप्पन श्रीनिवासन यांचे जावई असून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ आहेत. विंदूच्या कॉल डिटेल्समधून त्याने गुरूनाथ यांना कित्येक कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. विंदूस चेन्नईच्या व्हीआयपी बॉक्स मध्ये थेट प्रवेश होता, हे विशेष.

विंदू चेन्नई संघाच्या इतका जवळ कसा गेला, व तो या संघाचा खास कसा झाला, याचा तपास पोलिस करणार आहे. (वृत्तसंस्था)