1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (08:10 IST)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

Virat kohli
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा केली. त्याने सांगितले की त्याला त्याचे करिअर संपण्यापूर्वी सर्व काही करायचे आहे. 
 
विराट सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. नुकतेच त्याने कारकिर्दीतील विक्रमी आठवे शतक झळकावले. आरसीबीसाठी 13 सामने खेळलेल्या कोहलीने पाच अर्धशतकांच्या मदतीने 661 धावा केल्या आहेत. आरसीबी आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. 
 
आरसीबीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 35 वर्षीय खेळाडू त्याच्या निवृत्तीची चर्चा करताना दिसत आहे. कोहली म्हणाला, "मला कोणतेही काम अपूर्ण ठेवायचे नाही जेणेकरून नंतर पश्चाताप होऊ नये. काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन आणि काही काळ पुन्हा दिसणार नाही."
 
"जोपर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत मला माझे सर्वस्व खेळाला द्यायचे आहे. हीच माझी प्रेरणा आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीचा शेवटचा काळ येतो. मीही कायम खेळत राहणार नाही, पण साथ सोडणार नाही. 

Edited by - Priya Dixit