शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (23:27 IST)

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

RR vs PBKS
कर्णधार सॅम कुरनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव करत विजयाची चव चाखली. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव आहे. मात्र, राजस्थानचा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थानला नऊ विकेट्सवर 144 धावांत रोखले होते. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, 
 
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची फलंदाजी अत्यंत खराब झाली. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर पंजाबने करणच्या 41 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 63 धावांच्या जोरावर विजयाची नोंद केली. पंजाबकडून आशुतोष शर्माने 11 चेंडूत 17 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. राजस्थानकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. 
 
राजस्थान संघ 13 सामन्यांत आठ विजय आणि पाच पराभवांसह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाबचा संघ 13 सामन्यांत पाच विजय आणि आठ पराभवांसह 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. राजस्थानचा शेवटचा सामना टेबल-टॉपर्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध आहे, तर पंजाबला आता सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. 

Edited by - Priya Dixit