बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (23:26 IST)

SRH vs DC : हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी पराभव केला

आज आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडच्या 32 चेंडूत 89 धावा, अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 46 धावा आणि शाहबाज अहमदच्या 29 चेंडूत नाबाद 59 धावांच्या जोरावर 20 षटकात 7 गडी गमावून 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीसाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कने झंझावाती खेळी खेळली आणि 18 चेंडूत 65 धावा केल्या, मात्र तो बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव फसला आणि संघ 19.1 षटकांत 199 धावा करून सर्वबाद झाला. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने 35 चेंडूत 44 धावा केल्या. हैदराबादकडून टी. नटराजनने चार षटकांत 19 धावा देत चार बळी घेतले. 
 
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही आणि 25 धावांच्या स्कोअरवर टीमने पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरच्या विकेट्स गमावल्या. यानंतर मॅकगर्कने झंझावाती खेळी करत दिल्लीची धुरा सांभाळली आणि अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. मॅकगर्कने या मोसमातील दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, मयंक मार्कंडेने मॅकगर्कला बाद करून हैदराबादला दिलासा दिला आणि त्यानंतर दिल्लीने सातत्याने विकेट गमावल्या आणि आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर दिल्ली संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 
दिल्ली कॅपिटल्सचा डाव गडगडला असून संघाने199धावांत नऊ विकेट गमावल्या आहेत. कुलदीप यादवला बाद करून नटराजनने दिल्लीला नववा धक्का दिला. कुलदीप खाते न उघडताच बाद झाला.
 
Edited By- Priya Dixit