मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शुक्रवार, 19 जुलै 2019 (10:21 IST)

ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्‍सच्या जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे प्रथम स्थान अबाधित आहे. तर, बिल गेट्‌स यांची घसरण झाली असून त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. एलव्हीएमएच या लक्‍झरी गुड्‌स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेत बिल गेट्‌स यांना धक्का दिला आहे. गेल्या सात वर्षात हे प्रथमच घडत आहे.
 
जेफ बेझोस यांची संपत्ती 125 अब्ज डॉलर्स आहे. बेझोस यांचा नुकताच घटस्फोट झाला असून त्यांनी पत्नी मेकेन्झी बेझोस यांना काही रक्कम दिली होती. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे समोर येत आहे. मेकेन्झी या जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या आहेत. तर, बिल गेट्‌स यांनी बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनला 35 अब्ज डॉलर्स दान केल्याने त्यांचीही संपत्ती घटली.