सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

WhatsApp वर आता नवीन जागेवर दिसणार हे फीचर

सोशल मेसेजिंग अॅप WhatsApp यूजर्सच्या सुविधेसाठी नवीन फीचर्स आणत आहे. आता अॅपच्या प्लेसमेंटमध्ये बदल केले गेले आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेट मध्ये ‘Archived Chats’ ऑप्शनला मेन साइड मेन्यूमध्ये शिफ्ट करण्यात येईल. सध्या हे आपल्या आर्काइव्ह ऑप्शनमध्ये आपल्या Chats मध्ये सर्वात खाली दिसतं परंतू अपडेटनंतर याला Main Menu मध्ये बघता येईल.
 
अपडेटनंतर येथे दिसेल फीचर
 
आता WhatsApp उघडल्यावर तीन डॉटवर टॅप केल्यानंतर ‘New Group’, ‘New Broadcast’, ‘WhatsApp Web’, ‘Starred Message’ आणि ‘Settings’ चे ऑप्शन येतात परंतू 2.19.101 अपडेटनंतर या सीरिजमध्ये ‘WhatsApp Web’ च्या खाली ‘Archived Chats’ चे ऑप्शन मिळेल.