मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (15:24 IST)

व्हॉट्सअ‍ॅपवर मोठा धोका ! युजर्स ने या नंबरवर चुकूनही कॉल करू नका

whatsapp
व्हॉट्सअॅप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. यामुळे, स्कॅमर्सची नजर त्याच्या वापरकर्त्यांवर खूप असते. व्हॉट्सअॅपवर हॅकिंगचा धोका वेगाने वाढत आहे. हॅकर्स वापरकर्त्यांना मूर्ख बनवण्यासाठी एक नवीन पद्धत वापरतात, जेणेकरून ते व्हॉट्सअॅपची सिक्योरिटी मोडून खात्यात प्रवेश करू शकतात. क्लाउडसेकचे सीईओ आणि संस्थापक राहुल सासी यांनी आता माहिती दिली आहे की हॅकर्सना आता एक नवीन मार्ग सापडला आहे ज्याद्वारे ते वापरकर्त्यांच्या अकाउंट मध्ये शिरकाव करत आहेत.जेणे करून व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जाऊ शकते. या घोटाळ्यात, टार्गेटला हॅकरकडून कॉल येतो आणि तो वापरकर्त्याला विशिष्ट नंबरवर कॉल करण्यास सांगतो. युजर्सनेने नंबर डायल केल्यास, हॅकर वापरकर्त्याचे खाते सहजपणे ताब्यात घेऊ शकतो. ही अतिशय सोपी आणि छोटी प्रक्रिया आहे.
 
हे हॅक करण्यासाठी, हल्लेखोर पीडिताला कॉल करतो आणि त्यांना '**67*<10 अंकी नंबर> किंवा *405*<10 अंकी नंबर>' डायल करण्यास प्रवृत्त करतो. अशा परिस्थितीत, जर वापरकर्त्यांनी चुकून कॉल केला तर ते मोठ्या अडचणीत येतील आणि त्यांच्या खात्याचा प्रवेश हॅकर्सकडे जाईल. प्रवेश मिळवल्यानंतर, हॅकर्स वापरकर्त्याशी जोडलेल्या संपर्कांकडून पैसे मागतात. जेव्हा असे होते, तेव्हा वापरकर्त्याला कळते की त्याचे खाते हॅक झाले आहे.
 
जर कोणी तुम्हाला कोणत्याही सेवा प्रदात्याच्या नावाने 67 किंवा 405 ने सुरू होणार्‍या नंबरवर कॉल करण्यास सांगितले तर ते कधीही करू नका. याशिवाय, अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या व्हॉट्सअॅप  खात्यावर 2-स्टेप व्हेरिफिकेशन ऍक्टिव्हेट करणे आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड किंवा पिन सेट करणे.