1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
  4. bsnl new plan

बीएसएनएलकडून नवीन प्लॅन लॉन्च

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार बीएसएनएल यूजर्सना रोज 2 जीबी 3G डेटा मिळणार आहे. एवढच नव्हे, तर बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड कॉलिंग करु शकतात. बीएसएनएल युजर्सना या प्लॅनसाठी महिन्याला 339 रुपये मोजावे लागतील.“बीएसएनलचे ग्राहक रोज 2 जीबी डेटा वापरु शकतात. या प्लॅनची मुदत 28 दिवस असेल. याशिवाय, बीएसएनएल नेटवर्कअंतर्गत कॉलिंगसाठी 339 रुपयांची कॉम्बो ऑफरही देण्यात आली आहे.”, असे बीएसएनएलकडून माहिती देण्यात आली आहे.
पुढील लेख
नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण