गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:27 IST)

बीएसएनएलकडून अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च

bsnl offer
बीएसएनएलने ग्राहकांसाठी अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरनुसार कंपनी आता आपल्या ग्राहकांना दररोज 10 जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. बीएसएनएनलच्या नव्या ऑफरची किंमत 249 रुपये आहे. यामध्ये दररोज 10 जीबी इंटरनेट डेटा आणि त्याचसोबत रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. याचाच अर्थ बीएसएनएलने व्हॉईस कॉलिंगबाबत हात आखडता घेतला आहे. मात्र, इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या ऑफरमध्ये सर्वाधिक डेटा दिला जात आहे. हा प्लॅन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मानला जात आहे.