शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

या मोबाईल अॅप्स ने जाणून घ्या ATM मध्ये कॅश आहे की नाही

नोटा बंद झाल्यामुळे अनेक अॅप लाँच झाले आहे. यात एक क्लिकने माहिती मिळते. बघू असे अॅप्स:
 
CMS
कॅश मॅनेजमेंट अँड पेमेंट सोल्युशन अर्थात www.cms.com वेबसाइट सांगते की कोणत्या बँकेचं ATM कुठे आहे आणि त्यात कॅश उपलब्ध आहे की नाही. या वेबसाइटवर गेल्यावर ATM फाइंडर ऑप्शनवर क्लिक करावे लागणार. वेबसाइटने दावा केला आहे की त्यावर देशभरातील 55 हजार एटीएमची माहिती उपलब्ध आहे.
 
वॉलनेट
या अॅप ने चालू असलेले ATM बद्दल माहिती मिळते. याव्यतिरिक्त रियल टाइम कॅश उपलब्ध असल्याबद्दल माहितीही पुरवली जाते. या अॅपची atmsearch.in वेबसाइटही आहे.
लोक ATM
हा अॅप यूज करणे सोपे आहे. हा क्राउड सोर्सड अॅप आहे. यात लोकांना सांगण्याचा संधी मिळते की कोणत्या एटीएममध्ये कॅश आहे ज्याने दुसर्‍यांना याबद्दल माहिती मिळते. आपण येथे एटीएमबद्दल माहिती शेअर करू शकता.
 
कॅश नो कॅश
याचे यूजर इंटरफेस सोपे आहे. अॅप उडल्यावर पिनकोड टाकावं लागतं. ज्या क्षेत्रातील एटीएमबद्दल जाणून घ्याचे आहे तेथील पिनकोड टाकल्यावर संबंधित क्षेत्रातील किती ATM सक्रिय आहे आणि किती नाही हे स्क्रीनवर दिसू लागतं. त्या कॅश आहे की नाही? ATM चालू आहे की बंद? याबाबद अपडेटेड माहिती मिळत असते.