सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (12:32 IST)

Centre banned 14 mobile apps सरकारकडून 14 अ‍ॅप्सवर बंदी

Centre banned 14 mobile apps: केंद्र सरकारने 14 मोबाइल मेसेंजर अॅप्स ब्लॉक केले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अॅप्सद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये गुप्त संदेश पाठवत असत. सरकारने बंदी घातलेल्या अॅप्समध्ये Creepvisor, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi आणि Threema यांचा समावेश आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे केंद्र सरकारने ही कारवाई केली.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाला वेगवेगळ्या स्त्रोतांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये यूजर्सचा डेटा चोरून अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारताबाहेरील सर्व्हरवर ट्रान्सफर करण्यात आला.
 
Crypviser
Enigma
Safeswiss
Wickrme
Mediafire
Briar
BChat
Nandbox
Conion
IMO
Element
Second line
Zangi 
Threema
 
कारवाई आधीही झाली होती 
सरकारने अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. सरकारने आतापर्यंत 250 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या बंदी घातलेल्या अॅप्सच्या यादीत TikTok, PUBG मोबाइल आणि UC ब्राउझरचा समावेश आहे.