शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (09:19 IST)

अवघ्या ३ दिवसांत ५ लाखांहून अधिक डाऊनलोड

रोपोसो (Roposo),मित्रों (Mitron)आणि बोल इंडिया (Bolo Indya)नंतर चिंगारी (Chingari)नावाचे मेड इन इंडिया appलाँच केले गेले आहे. ज्याला अवघ्या ३ दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. चिंगारी हे एक शॉर्ट व्हिडिओ अॅप आहे. जे बंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी तयार केले आहे. 
 
लाँच झाल्यानंतर ३६ तासांच्या आत, चिंगारी अॅप गूगल प्ले-स्टोअरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये होते. चिंगारी अॅप हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्ले-स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, यावर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता आणि आपल्या मित्रांसह शेअर करू शकतात. या अ‍ॅपवर तुम्हाला ट्रेंडिंग बातम्या, करमणूक, मजेदार व्हिडिओ, स्टेटस असे व्हिडिओ मिळतील. 
 
चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्स करू शकतात. यावरील व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यासाठी स्वतंत्र बटण देण्यात आले आहे, जे चिनी अॅप हॅलोसारखे आहे. अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यास फॉलो करण्याची देखील संधी आहे.