शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

डिजीटल पेमेंटला आज मिळणार चालना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आज शुक्रवार 14 एप्रिल रोजी नागपूर येथे डिजिटल व्यवहारांना देशभरात प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक नव्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. 
 
यात व्यापार्‍यांसाठी भीम (भारत इंटरफेस फॉरमनी) अॅपचे आधारशी निगडीत डिजीटल प्लॅटफॉर्म, 'भीम'साठी रेफरल बोनस (निर्देशित लाभांश) व कॅशबॅक योजना तसेच कमी रोकड असलेल्या वस्त्यांच्या नावांची (लेस कॅश टाउनशीप्स) घोषणा या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट आहेत. याप्रसंगी, डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आखलेल्या दोन प्रमुख प्रोत्साहनवर योजना लकी ग्राहक योजना आणि डिजि-धन व्यापार योजनेतील मेगा ड्रॉच्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.