शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2023 (19:32 IST)

आता इंटरनेट गेलं तरी व्हॉट्सअप सुरू राहणार कारण

व्हॉट्सअप आता त्यांच्या ग्राहकांना प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याची सोय करून देणार आहे. म्हणजे इंटरनेट बंद झाल्यावरही ग्राहक ऑनलाईन राहू शकतील. इराण सारख्या देशात सध्या इंटरनेट ब्लॅक आऊट होत आहे. या सेवेमुळे आता ते होणार नाही असं व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाचं मत आहे.
 
इराणमध्ये सध्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. संकटसमयी त्यांना मदत मागण्यापासून थांबवलं जात आहे.
 
व्हॉट्सअप ने जगभरातील लोकांना प्रॉक्सी सर्व्हर तयार करण्याची विनंती केली आहे जेणेकरून लोक विनासायास एकमेकांशी संवाद साधू शकतील. कंपनीच्या मते, ते लोकांना प्रॉक्सी सर्व्हर स्थापन करण्यात मदतही करतील.
 
प्रॉक्सी सर्व्हर तयार झाल्यावरही मेसेजेस End to end Encrypted राहतील.
 
याचा अर्थ सा की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेले मेसेज कोणीही वाचू शकणार नाही. इतकंच काय व्हॉट्सअपही वाचू शकणार नाही.
 
प्रॉक्सी आणि ऑनलाईन माहिती गोळा करणाऱ्या ऑक्सी लॅब्स कंपनीच्या जुरास जर्सेनस यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "इराणमध्ये ज्या पद्धतीने इंटरनेटच्या वापरावर निर्बंध लागताहेत, त्यात प्रॉक्सी सर्व्हरच्या मदतीने लोक कोणत्याही अडचणीविना इंटरनेटचा वापर करू शकतील."
 
Published By- Priya Dixit