फेसबुकवरील असंख्य खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला फेसबुकने देखील दुजोरा दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून फेसबुकच्या बनावट खात्यांमध्ये भर पडत असून आता त्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीमध्ये रशियाच्या भूमिकांबाबत फेसबुकची चौकशी सुरु असताना आता ही आणखी एक नवीन बाब समोर आली आहे.
एका संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, फेसबुकवर सुमारे २७ कोटी खाती ही बनावट आहेत. समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र इतकी बनावट खाती कशी काय? ती कोणी काढली आणि त्याचे पुढे काय होणार याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेले नाही. दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर फेसबुकने राजकीय जाहिराती पारदर्शक बनविण्याचे वचन दिले होते. सध्या फेसबुकचे २०७ कोटी यूजर्स आहे. त्यातील जवळपास २७ कोटी खाती ही बनावट आहेत.