बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:13 IST)

फेसबुक अचानक बंद पडले

फेसबुक सोशल मीडिया साईट मंगळवारी संध्याकाळी अचानक बंद पडली. सुरुवातीला काहींना मोबाईलला किंवा लॅपटॉपला काहीतरी समस्या झाली आहे असे वाटले. पण व्हॉटसअॅप किंवा ट्विटर यांसारख्या इतर माध्यमांतून एकमेकांशी संपर्क केल्यावर ही फेसबुकचीच समस्या असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. 

ट्विटरवर फेसबुक बंद असल्याने एकच गोंधळ उडाला आणि नेटकऱ्यांनी ही सोशल मीडिया साईट बंद झाल्याचे दुख: व्यक्त करण्यास सुरुवात केली. सॉरी समथिंग वेंट राँग, अनेबल टू कनेक्ट, नेटवर्क एरर असे मेसेज येत होते. असे असले तरीही एद्याप फेसबुकच्या अधिकृत हँडलवरुन याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. याआधी फेसबुक अशाप्रकारे बंद झाल्याची घटना भारतात तरी घडलेली नव्हती. त्यामुळे ही पहिलीच वेळ होती. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास ४० मिनिट व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती.