शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आता फेसबुक लवकरच टीव्ही स्क्रीनवर

facebook in tv screen
फेसबुक लवकरच टीव्ही स्क्रीनवर येत आहे. कंपनी सेट टॉप बॉक्ससाठी अॅप तयार करत असून ते व्हिडिओ अॅप असेल. या माध्यमातून युजर्स आपल्या फोन व कॉम्प्युटरमधील व्हिडिओ टीव्हीवर पाहू शकतील. सध्या हे अॅप अॅपल टीव्ही, अॅमेझॉन फायर टीव्हीसह मोजक्या टीव्हीवरच वापरता येणार आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष डॅन रोज म्हणाले, ‘या सोशल साइटवर रोज लाखो व्हिडिओ पोस्ट होतात. लोकांना ते पाहायचे असतात. मात्र, इतका वेळ त्यांच्याकडे नसतो. येणारे नवे अॅप यात मदत करेल. युजर्स फोन किंवा कॉम्प्युटरवर आपले फेसबुक अकाऊंट पाहत असताना व्हिडिओ सेव्ह करू शकतील. नंतर मोकळा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीमध्ये इन्स्टॉल केलेल्या अॅपच्या माध्यमातून टीव्हीवर ते पाहू शकतील. यासाठी युजरकडे फेसबुक अकाउंट असणे मात्र गरजेचे आहे.