गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (16:30 IST)

Free VIP Mobile Number:प्रत्येकाला VIP मोबाईल नंबर मिळेल, कसा काय जाणून घ्या

How to Get VIP Mobile Number: इंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या आगमनाने आपल्याला सुविधा तर मिळाल्याच पण आपली जीवनशैलीही खूप बदलली आहे. यामुळेच अनेकांना फॅन्सी मोबाईल नंबर खरेदी करायचे असतात. ज्याप्रकारे वाहनांना फॅन्सी क्रमांक घेण्याची आवड आहे, त्याचप्रमाणे लोकांनाही आवडीचा मोबाईल क्रमांक घ्यावासा वाटतो. 
 
व्हीआयपी नंबरसाठी, तुम्हाला सामान्य कनेक्शनपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. काही वेळा त्यांचा लिलावही केला जातो,  ज्यामध्ये नंबरसाठी बोली लावली जाते. विशेषत: बीएसएनएलच्या व्हीआयपी क्रमांकांबाबत असेच घडते. व्हीआयपी नंबर मोफत कसा मिळेल हा प्रश्न आहे. 
 
व्हीआयपी क्रमांक मोफत मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
 
या क्रमांकांना व्हीआयपी किंवा फॅन्सी म्हटले जाते कारण ते सामान्य क्रमांकांपेक्षा वेगळे असतात आणि तुम्ही ते एका दृष्टीक्षेपात लक्षात ठेवू शकता.  जर तुम्हाला असा नंबर घ्यायचा असेल तर  कोणत्याही अधिकृत कंपनीचा ऑफर घेऊ शकता .प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीसाठी व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर खरेदी करू शकता. या साठी या टिप्स अवलंबवा 
 
सर्वप्रथम तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
येथे तुम्हाला नवीन कनेक्शन श्रेणी मिळेल.या विभागात तुम्हाला फॅन्सी नंबर श्रेणीवर क्लिक करावे लागेल. 
 
आता तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला प्रीपेड कनेक्शन हवे आहे की पोस्टपेड हे ठरवायचे आहे. 
येथे तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा पिन कोड आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. आता तुम्हाला तो नंबर शोधायचा आहे जो तुम्हाला विकत घ्यायचा आहे किंवा तुम्हीत्या कंपनीच्या फ्री लिस्टमधून कोणताही नंबर निवडू शकता. तुम्हाला फ्री आणि प्रीमियम नंबर यापैकी एक निवडावा लागेल. प्रीमियम नंबरसाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा क्रमांक मिळाला तर तुम्ही प्रीमियम पर्यायासाठीवर जावे.
 
अन्यथा, तुम्ही विनामूल्य श्रेणीमध्ये उपलब्ध असलेला कोणताही क्रमांक निवडू शकता. नंबर निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल. पेमेंट केल्यानंतर, कंपनी सिम तुमच्या घरी पोहोचवेल. अशा प्रकारे तुम्ही आपल्या आवडीचा मोबाईल नंबर मिळवू शकता.