मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:24 IST)

इंटरनेट शटडाऊन मुळे जागतिक आर्थिक नुकसान

सध्याचे जग इंटरनेटचे आहे. इंटरनेट नसेल तर सर्वसामान्य जीवन अस्तव्यस्त होईल. आज इंटरनेटमुळे आपली सर्व कामे सहज होतात. इंटरनेट नसेल तर सर्व आर्थिक व्यवहार बंद पडतील. इंटरनेट बंद होण्याचा फटका सम्पूर्ण जगाला होईलच. 2021 मध्ये सरकारी सुरक्षाविषयक कारणांमुळे इंटरनेट बंद झाले या मुळे जगभरात नुकसान झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला यामुळे 5 .45 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. याचा जास्त प्रमाणात फटका भारताला पडला आहे.सर्वाधिक नुकसान झालेल्या 10 देशांच्या यादीत भारताचे स्थान तिसरे आहे.  भारतातील अनेक भागात काहीं न काही कारणामुळे इंटरनेट बंद पडले. मग ते महापुरामुळे असो, किंवा काही इतर कारणांमुळे असो. ह्याचा सर्वाधिक नुकसान भारताचे झाले आहे. भारतात1,157 तास इंटरनेट बंद पडले होते. या इंटरनेटच्या शट डाऊन चा फटका तब्बल 5.91 कोटी युजर्स ला पडला आहे. तर 58.2 कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे.