सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (15:30 IST)

5G मध्ये भारताची मोठी झेप एका वर्षात तिसऱ्या क्रमांकावर, देशातील 85 टक्के 5G नेटवर्क जिओचे - आकाश अंबानी

akash ambani
• प्रत्येक 10 सेकंदाला एक 5G सेल तैनात केला
• जिओचे नेटवर्क 100% इन-हाउस 5G स्टॅकवर कार्य करते.
 देशात 5G लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे 5G नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने गेल्या वर्षी देशभरात दर 10 सेकंदाला एका सेलच्या दराने सुमारे 10 लाख 5G सेल तैनात केले आहेत. रिलायन्स जिओने देशातील एकूण 5G नेटवर्कपैकी 85 टक्के नेटवर्क स्थापित केले आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही माहिती दिली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनाचा संदर्भ देत आकाश अंबानी म्हणाले, “आपण आम्हाला भारताला हायटेक पद्धतीने आत्मनिर्भर बनवण्यास सांगितले होते. आम्ही यावर काम केले आहे, जिओ चे 5G रोलआउट 100% इन-हाऊस 5G स्टॅकवर कार्य करते, पूर्णपणे भारतीय प्रतिभांनी डिझाइन केलेले आणि विकसित केले आहे. 12 कोटींहून अधिक 5G ग्राहकांसह, भारत आज जगातील पहिल्या तीन 5G सक्षम देशांपैकी एक आहे.”
 
जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाले, “पंतप्रधानांना आम्ही वचन देतो की आम्ही तंत्रज्ञानाच्या बळावर डिजिटल स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करू. जे तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीच्या बळावर भारताला जगातील सर्वात समृद्ध, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेल. सर्व तरुण डिजिटल उद्योजक, तरुण डिजिटल इनोव्हेटर्स आणि आईएमसी (IMC )च्या तरुण डिजिटल स्टार्ट-अप्सच्या वतीने मी आपल्याला खात्री देतो की आम्ही भारताच्या अमृत कालदरम्यान हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.” 
 
 




Edited by - Priya Dixit