शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (12:57 IST)

जिओ फायबर सर्वर डाऊन युजर्सना इंटरनेट वापरताना अडचण

Jio True 5G
जिओ फायबरचा सर्व्हर डाऊन झाला. बुधवारी सकाळी इंटरनेट सेवाचा वापर करायला युजर्सला अडचण आली. सकाळी 11:30 वाजता जीओची ब्रॉडबँड सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. कंपनीने सर्व्हर प्रॉब्लम दुरुस्त करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशात जीओची सर्व्हिस ठप्प राहिली. 
 
DownDetector च्या ग्राफनुसार, देशात सकाळी 10 वाजे पासून जिओ आउटेजची समस्या सुरु झाली सकाळी 11 पर्यंत जिओच्या कनेक्टिव्हिटी समस्या असल्याची तक्रार युजर्स कडून करण्यात आली.  सुमारे 400 वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर तक्रारी केल्या आहेत. ट्विटरवरही JioDown ट्रेंड होत आहे.

जिओ फायबर काम करत नसल्याची तक्रार युजर्स करत आहे. जिओ फायबर बंद असल्याची तक्रार चंदीगड, दिल्ली -एनसीआर, मुंबई , बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई मध्ये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जिओ टीम सर्व्हरने समस्येचे निराकरण करण्यासाठी काम सुरु केले असून काही तासात जीओची सेवा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. 
 
Edited By - Priya Dixit