गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2017 (11:34 IST)

जिओच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चा शेवटचा दिवस

jio happy new year last day
एप्रिलपासून जिओची ‘हॅप्पी न्यू इअर’ मोफत सेवा बंद होणार आहे. सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि डेटा प्लान देण्यात आला होता. मात्र आता ही मोफत सेवा बंद होत असून ग्राहकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. जिओची प्राईम मेंबरशीप हवी असल्यास आज म्हणजेच 31 मार्च शेवटची मुदत आहेत. 31 मार्चनंतर ही ऑफरही बंद केली जाणार आहे.  प्राईम मेंबरशीप घेतल्यास दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय जिओनं 499 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये  मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात.