मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओने होम डिलिव्हरी सेवा सुरु केली

Jio home delivery service
ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी होम डिलिव्हरी सेवा जिओनं सुरु केली आहे. आतापर्यंत जिओचं सिम होम डिलिव्हरीमार्फत मिळत होतं. पण यापुढे अवघ्या 90 मिनिटात तुमच्यापर्यंत जिओफाय हॉटस्पॉट डोंगल पोहचू शकणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.
 
जिओफाय हॉटस्पॉट डोंगलची किंमत 1,999 रुपये आहे. जर तुम्ही तुमचं जुनं राउटर किंवा डोंगल एक्सचेंज केलं तर तुम्हाला यामध्ये 2,010 रुपये किंमतीचा डेटा मिळेल. म्हणजेच तुमचं नवं राउटर फ्री असेल. देशात 600 ठिकाणी जिओच्या सिमची होम डिलिव्हरी सुरु आहे. आता कंपनीनं आपल्या हॉटस्पॉट डोंगलचीही होम डिलिव्हरी सुरु केली आहे. यासाठी तुम्हाला जिओच्या वेबसाइटवर जाऊन पिनकोड टाकावा लागेल. कारण त्यानुसार तुम्हाला ही डिलिव्हरी होऊ शकते की नाही हे समजणार आहे.