शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (23:33 IST)

Jioने 3GBडेटा आणि मोफत कॉलिंगसह लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान

रिलायन्स जिओने आपला सर्वात स्वस्त प्लान सादर केला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी 75 रुपयांचा मोठा प्लॅन लॉन्च केला आहे, जो एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) ला कठोर स्पर्धा देईल. जिओने आपला 69 रुपयांचा प्लॅन नुकताच बंद केला आहे, त्यानंतर हा नवा प्लान लॉन्च करण्यात आला आहे. Jio.com च्या अधिकृत वेबसाइटवर पाहिले तर 69 रुपयांचा प्लान दिसत नाही. जाणून घेऊया जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनचे डिटेल…

कसे आहेत ...
 
जिओच्या 75 रुपयांच्या नवीन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना फक्त जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहे, म्हणजेच इतर ग्राहक हा प्लॅन वापरू शकत नाहीत.
 
JioPhone वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैलिडिटी मिळते. या व्यतिरिक्त, दररोज 50 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio News, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचा अॅक्सेस देखील या प्लानमध्ये देण्यात आला आहे. 
 
 जिओ अॅप्सचे एक्सेस देखील मिळेल  
कॉलिंगच्या स्वरूपात, जिओ ग्राहकांना 75 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाते. यासह, 200MB बूस्टरसह संपूर्ण वैधतेदरम्यान 3GB डेटा मिळेल.