शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018 (08:16 IST)

जिओच्या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक

जिओने दिवाळी जिओ ऑफर्स असं या नव्या प्लानचं नाव आहे. या प्लानमध्ये 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांना या प्लानचा लाभ 18 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर मध्ये घेता येणार आहे. याचा फायदा सगळ्या ग्राहकांना मिळणार आहे.या प्लानची मुदत एक वर्षासाठी आहे.
 
जिओच्या या प्लानची किंमत 1699 रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. याशिवाय रोज 100 एसएमएस आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना 547.5 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर 64 केबीपीएसची स्पीड मिळणार आहे.
 
जिओ दिवाळी कॅशबॅक ऑफरमध्ये जर तुम्ही 18 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरच्या मध्ये 1699 चा रिचार्ज केला तर तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. यात  एकूण 3 कूपनमध्ये ही ऑफर मिळणार आहे. एका कूपनची किंमत 500 रुपये आहे. याशिवाय 200 रुपयाच्या कूपनचा उपयोग ग्राहक रिलायंस डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर्समध्ये करता येणार आहे. यासाठी कमीतकमी 5000 रुपयांची खेरदी करावी लागेल.