गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओकडून JioFi राउटरसाठी एक नवी ऑफर

रिलायन्स जिओने JioFi राउटरसाठी एक नवी ऑफर आणली आहे. यात ग्राहक आपलं जुनं राउटर, डोंगल, किंवा डेटा कार्ड एक्सचेंज करुन जिओचं नवं 4G राउटर घेऊ शकतात. यासाठी जिओच्या कोणत्याही डिजिटल स्टोअर किंवा जिओ केअर स्टोअरमधून ग्राहक आपला जुनं राउटर, डोंगल, किंवा डेटा कार्ड बदलून नवं JioFi राउटर घेऊ शकतात. 
 
सोबतच यूजर्सला JioFi राउटरसाठी 1999 रुपये द्यावे लागणार आहेत. यासोबतच 408 (309+99) रुपये एवढं बेसिक रिचार्ज करावं लागेल. यामध्ये जर तुम्ही जुनं राउटर, डोंगल एक्सचेंज केलं तर त्याऐवजी 2,010 रुपये किंमतीचा डेटा तुम्हाला मिळणार आहे.