शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (17:00 IST)

Jio या बाबतीत इतर कंपन्यांहून आहे पुढे, फायदा जाणून तुम्ही व्हाल हैराण

रिलायंस जियो (Reliance Jio) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीची सिम वापरणार्‍या ग्राहकांना आता आधीच्या तुलनेत जास्त फायदे मिळणार आहे. ही खुशखबरी जियोच्या एपशी निगडित आहे. आता जियो यूजर्सला 621 चॅनल्स मिळतील. ही संख्या इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच, बर्‍याच डीटीएच कंपन्या देखील एवढे चॅनल्स उपलब्ध करत नाही आहे.
 
जियो एपची गोष्ट केली तर एकूण 621 चॅनल्समध्ये जास्त करून न्यूज आणि एंटरटेंमेंटचे चॅनल्स आहे. तसेच 50 चॅनल्स अध्यात्म आणि 49 एजुकेशनल चॅनल्स आहे. त्याशिवाय 27 चॅनल्स मुलांसाठी, आठ बिझनेस न्यूज चॅनल्स देखील सामील आहे.
 
या एपचे कंटेंट देखील यूजर्सला बर्‍याच भाषांमध्ये मिळत आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, ह्या भाषा हिंदी, अंग्रेजी, तेलुगू, तमिळ, मल्ल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, उडीया, भोजपुरी, उर्दू, बंगाली, फ्रेंच इत्यादी आहे. त्याशिवाय 46 अंग्रेजी एचडी आणि 32 हिंदी एचडी चॅनल्स आहेत.
 
तसेच दुसरीकडे Airtel कंपनी आपल्या ऐपवर 375 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स यूजर्सला उपलब्ध करवून देत आहे. त्याशिवाय यूजर्सला एपवर दस हजार पेक्षा अधिक मूवीज इत्यादी मिळणार आहे. तसेच वोडाफोन एपवर देखील यूजर्सला 300 पेक्षा जास्त लाइव्ह टीवी चॅनल्स मिळतील. त्याशिवाय 5000पेक्षा जास्त मूवीज पण वोडाफोन एप वर उपलब्ध आहेत.