1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
  4. JioTag 2 Launches in India finding lost items becomes even easier

JioTag 2 अगदी कमी किंमतीत लाँच; आता मौल्यवान वस्तू शोधणे झाले अधिक सोपे

रिलायन्स जिओने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्ट ट्रॅकिंग डिव्हाइस 'JioTag 2' लाँच केले आहे. हे डिव्हाइस अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. २०२३ मध्ये लाँच झालेल्या पहिल्या जिओटॅगची ही अपग्रेटेड आवृत्ती आहे. याच्या मदतीने युजर्स आपल्या किल्ली, पाकीट, बॅग किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू सहजरित्या ट्रॅक करू शकतात.
 
किंमत आणि उपलब्धता:
किंमत: ₹१,२४९
रंग: ब्लॅक, ग्रीन आणि रेड 
उपलब्धता: हे डिव्हाइस Amazon India वरून खरेदी करता येईल.
 
'JioTag 2' ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फीचर्स:
१. क्रॉस-प्लॅटफॉर्म सपोर्ट (Find My Network): हे ट्रॅकर Google Find Hub आणि Apple Find My या दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करते. त्यामुळे अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स आपल्या 'फाइंड माय' अ‍ॅपद्वारे वस्तूंची लोकेशन सहज पाहू शकतात.
 
२. १२०dB चा मोठा इनबिल्ट बजर: जर टॅग केलेली वस्तू ब्लूटूथ रेंजच्या आत असेल, तर युजर्स अ‍ॅपद्वारे यातील 120dB तीव्रतेचा बीप/बजर वाजवून ती वस्तू शोधू शकतात.
 
३. कम्युनिटी ट्रॅकिंग आणि लॉस्ट मोड: वस्तू ब्लूटूथ रेंजच्या बाहेर गेल्यास, आसपास असलेली इतर अँड्रॉइड किंवा आयफोन डिव्हाइसेस गुप्तपणे (Anonymously) तिची लोकेशन अपडेट करण्यास मदत करतात. यात 'लॉस्ट मोड' (Lost Mode) देखील देण्यात आला आहे.
 
४. सिम कार्ड किंवा डेटा प्लॅनची गरज नाही:  हे ट्रॅकर चालवण्यासाठी कोणत्याही सिम कार्ड, सेल्यूलर नेटवर्क किंवा डेटा प्लॅनची आवश्यकता नाही. हे नेटवर्कच्या आधारे सेमी-रिअल-टाइम लोकेशन ट्रॅक करते.
 
५. १ वर्षाची बॅटरी लाईफ: यात बदलता येणारी (Replaceable) बॅटरी दिली आहे, जी तब्बल १ वर्ष चालते. विशेष म्हणजे बॉक्ससोबत कंपनी एक अतिरिक्त (Extra) बॅटरी मोफत देत आहे, त्यामुळे वारंवार चार्जिंगचे झंझट नाही.
 
६. वॉटर व डस्ट रेजिस्टंट: या डिव्हाइसला IP64 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्याच्या किरकोळ शिंतोड्यांपासून सुरक्षित राहते.
पुढील लेख
आरोग्यसेवा विस्कळीत! नोंदणी प्रस्तावाविरोधात नाशिकमध्ये अडीच हजार डॉक्टरांचा आज संप