शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (13:54 IST)

कसा वाचवायचा मोबाइल डाटा जाणून घ्या...

इंटरनेट डाटा महिनाभर कसा पुरवायचा हे जाणून घेऊ या. 
 
स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये गेल्यावर डाटा लिमिट हा ऑप्शन दिसतो. सेटिंग्जमध्ये डाटा युजेस ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाटाचं लिमिट ठरवू शकता. या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर स्मार्टफोन डाटाचा वापर बंद करतो. यामुळे आपण किती डाटा वापरला हे कळू शकतं. या सेटिंगमुळे तुम्ही मोबाइल डाटा वाचवू शकता. 
 
डाटा मॅनेजमेंटची काही अ‍ॅप्स आहेत. ती डाउनलोड करूनतुम्ही फोनमधला डाटा मॅनेज करू शकता.
 
डाउनलोड सेटिंग्जमध्ये बदल करून तुम्ही डाटा वाचवू शकता. फोन आणि अ‍ॅप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन डाउनलोड व्हेन वायफाय ऑन या पर्यायाची निवड करू शकता. यामुळे फोन वायफायशी जोडल्यानंतरच बर्‍याच गोष्टी डाउनलोड होतील आणि तुमचा डाटा वाचेल. 
 
जास्त डाटा वापरणार्‍या अ‍ॅप्सची माहिती करून घ्या. या अ‍ॅप्सचा वापर कमी करा. नको असणारी अ‍ॅप्स डिलीट करून टाका. 
 
बरीच लाईट अ‍ॅप्स सादर करण्यात आली आहेत. फेसबुक लाईटपासून यू ट्यूब गो पर्यंत बरीच अ‍ॅप्स डाटा वाचवू शकतात. अशी अ‍ॅप्स डाउनलोड करून डाटाची बचत करा.