शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (12:07 IST)

परफेक्ट सेल्फीसाठी नवे अॅप

अॅपमुळे यूजरला कॅमेरा पोजिशन केल्यावर बेस्ट शॉट मिळेल हे समजू शकेल. कॅनडाच्या वॉटर्लू युनिव्हर्सिटीच्या डॅनवोगल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या सेल्फीच्या माध्यमातून लोक स्वत:ला आणि आपल्या अनुभवांना जाहीर करू लागले आहेत. मात्र, सर्वांची सेल्फी एकसारखी नसते. काही अॅप सेल्फी टिपल्यावर ती दुरुस्त करते. मात्र, ही नवी सिस्टीम युजर फोटो टिपण्यापूर्वीच चांगला सेल्फीसाठी टीप्स देते. त्यामध्ये लायटिंग डायरेक्शन, फेस पोजिशन आणि फेस साईजबाबतच्या माहितीचा समावेश आहे. ही केवळ सुरुवात असून भविष्यातील अॅप आपली हेअरस्टाईल, स्मितहास्य आणि पोशाखांबाबतही सूजना  देऊ शकते, असे त्यांनी सांगितले.