1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (15:42 IST)

पेटीएमची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन डॉलर

paytm market value 10 billion dollar
ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप कंपनी पेटीएमची मार्केट व्हॅल्यू 10 बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. पेटीएमच्या आजी-माजी सुमारे 200 कर्मचार्‍यांनी त्यांचे ESOP विकले आहेत. त्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. यामुळे अनेक कर्मचारी कोट्याधीश झाले आहेत. ज्यांनी पेटीएमचे शेअर विकून कमाई केली आहे त्यामध्ये पेटीएम कॅनडाचे चीफ एक्झिक्युटीव्ह हरिंदर ठक्कर यांचेही नाव आहे. त्यांनी 40 कोटी कमावले आहेत. तर एका ऑफिस बॉयने 20 लाख कमावले आहेत. ज्या कर्मचार्‍यांना फायदा झाला आहे त्यामध्ये टेक्नोलॉजी, प्रोडक्ट, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हयूमन रिसोर्स, सेल्स आणि फायनांस यांचा समावेश आहे.  
 
दुसरीकडे जपानी बॅंक 'सॉफ्ट बॅंक' यांनी देखील पेटीएममध्ये 1.4 बिलियन डॉलरची इन्व्हेसमेंट केली आहे. फ्लिपकार्टनंतर पेटीएमच्या व्हॅल्युमध्ये वाढ झाल्याने आता ती दुसर्‍या क्रमाकांवर आली आहे.