बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (23:28 IST)

Jio चा 1 प्लॅन 4 लोक चालवू शकतील, दरमहा 200GB डेटा, Netflix-Prime देखील मोफत

रिलायन्स जिओ आपल्या प्रीपेड तसेच पोस्टपेड वापरकर्त्यांना उत्तम योजना ऑफर करत आहे. कंपनी JioPostPaid Plus अंतर्गत एकूण 5 पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे.विशेष बाब म्हणजे कंपनीचा एक प्लान एकाच वेळी 4 लोक वापरू शकतात.तुमच्याही कुटुंबात चार सदस्य असतील तर तुमची सर्व कामे एकाच योजनेत होतील.प्लॅनची ​​किंमत 999 रुपये आहे.त्याचे डिटेल्स जाणून घेऊया. 
 
जिओचा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
जिओचा हा पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांचा आहे.प्लॅनमध्ये तुम्हाला 200 GBडेटा दिला जातो.मर्यादा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाते.प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. 
 
यामध्ये एका प्राथमिक सिमसोबत 3 अतिरिक्त सिम देखील देण्यात आले आहेत.म्हणजेच एकाच वेळी 4 जणांना एकच योजना वापरता येणार आहे.एकूण 200 GB डेटा मिळण्याचा अर्थ असा आहे की जर सर्व वापरकर्ते समान रीतीने वापरत असतील तर एका वापरकर्त्याला एका महिन्यात 50 GB डेटा मिळेल. 
 
इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, प्लॅनमध्ये 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील देण्यात आली आहे.यासोबत Amazon Prime, Netflix, Disney + Hotstar, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील दिले आहे.