1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:06 IST)

इन्फोसिसचा सीईओ नारायण मूर्तींचा मुलगा ?

rohan murty
इन्फोसिसच्या सीईओ पदावरून विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर आता इन्फोसिसच्या सीईओ पदासाठी नारायण मूर्तींचा मुलगा रोहन मूर्तीचा विचार होणार आहे, अशी माहिती रवी वेंकटेशन यांनी दिली आहे. रवी वेंकटेशन इन्फोसिसचे को चेअरमन असून सिक्कांनी राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या  पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नवीन सीईओला कंपनीचे कल्चर माहित असावे, त्यांना कंपनीच्या क्लायंट्सच्या समस्यांचा जाण असावी आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्यांशी नवीन सीईओची अत्यंत फ्रेंन्डली वागणूक असावी अशी कंपनीची अपेक्षा असल्याचे वेंकटेशन यांनी यावेळी सांगितले. यामुळेच नारायण मूर्तींच्या मुलाचा विचार होऊ शकतो. नवीन सीईओच्या नावावर शिक्कामोर्तब 31 मार्च 2018 पर्यंत होईल. दरम्यान राजीनामा घ्यायचा निर्णय आज सकाळीच घेतला असल्याची माहिती विशाल सिक्का यांनी दिली आहे.