शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2017 (11:11 IST)

अँपच्या माध्यमातून सचिन भेटणार त्याच्या चाहत्यांना

सोशल मीडियावर सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सोनू निगम यांच्या हातात बॅट, तर सचिन तेंडुलकरच्या हातात माईक दिसत आहे.
 
फोटो मागचे व्हायरल सत्य :
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता गायक बनला आहे. आपल्या नव्या डिजिटल अॅपच्या प्रसारासाठीसोनू निगमच्या साथीने सचिनने स्वतः गाणं गायलं आहे.
 
सचिननं रेकॉर्ड केलेलं हे पहिलं गाणंही अर्थातच क्रिकेटला समर्पित केलं आहे.
 
सचिनचं हे गाणं येत्या रविवारी रात्री दहा वाजता सचिनच्या चाहत्यांना 100 एमबी या त्याच्या अधिकृत मोबाईल अॅपवरून ऐकता येणार आहे.