शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:45 IST)

फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली उडविली

फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी उडविली आहे. जॅक डॉर्सी यांनी एक ट्विट करुन फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली उडवली आहे. या ट्विटमध्ये केवळ तीन शब्द लिहिलेत. ‘Twitter from TWITTER’ या तीन शब्दांमध्येच डॉर्सी यांनी ट्विट केलंय. हे ट्विट प्रथमदर्शनी फेसबुकच्या नव्या कॅपिटल अक्षरांच्या लोगोची खिल्ली उडवणारं वाटतंय. पण, यासोबतच डॉर्सी यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या ‘from Facebook’या नावाचीही टर उडवलीये. 
 
फेसबुकने नवा लोगो लाँच करतेवेळी, वेगळेपण राहावं यासाठी फेसबुकशिवाय इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपसारख्या कंपनीच्या इतर सेवांमध्ये ‘from Facebook’ हे नाव दिसेल असं स्पष्ट केलं होतं. डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये याचीही खिल्ली उडवली आहे.