मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2017 (11:09 IST)

व्होडाफोन सुपरनाईट प्लान, 29 रुपयात ५ तास अनलिमिटेड डेटा

‘व्होडाफोन सुपरनाईट’ हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी लाँच केला आहे. ज्यामध्ये 29 रुपयात पाच तास अनलिमिटेड 3जी किंवा 4जी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये अवघ्या 6 रुपयात तासाभरासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. सोबतच  मिळणारा डेटा तुम्ही रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड वापरु शकता. व्होडाफोननं दिलेल्या माहितीनुसार, ‘हा प्लान तुम्ही कधीही अॅक्टिव्हेट करु शकता. पण रात्री एकवाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग करता येऊ शकतं.’ सुपरनाईट पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना *444*4# डायल करावं लागेल. याशिवाय रिचार्ज शॉपमधूनही रिचार्ज करु शकतात.