मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (23:33 IST)

WhatsApp द्वारे पेमेंट करणे झाले सोपे, जाणून घ्या कसे

Whatsapp adds rupee symbol in chat composer to ease sending payments
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट करणे आता सोपे होईल. वास्तविक, कंपनीने गुरुवारी  भारतीय वापरकर्त्यांसाठी आपल्या चॅट कंपोजर ₹ चिन्ह सादर केले. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये कंपनीने ही घोषणा केली. कंपनीने असेही जाहीर केले आहे की, कंपोझरमधील कॅमेरा आयकॉन आता भारतातील 20 दशलक्षाहून अधिक स्टोअरमध्ये पेमेंट करण्यासाठी कोणताही क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करू शकतो.
 
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवा टप्प्याटप्प्याने लाइव्ह करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मान्यता मिळाली.
 
या दोन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅपवर पेमेंट करणे सोपे झाले आहे कारण वापरकर्ते आता चॅट कंपोजरच्या आत दोन आयकॉनिक सिम्बॉल (₹ सिम्बॉल आणि कॅमेरा आयकॉन) वापरून पैसे पाठवू शकतात. ₹ रुपयाचे चिन्ह सुरू झाले आहे आणि लवकरच ते भरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
 
UPI पेमेंट सेवा काय आहे
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस / यूपीआय (Unified Payments Interface) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकते. UPI द्वारे, तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.