शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (22:32 IST)

Novi इंटीग्रेशनवर आता WhatsApp वापरकर्ते ग्लोबली ट्रांसफर करू शकतील पैसे!

व्हॉट्सअॅप इतर देशांमध्ये पीअर-टू-पीअर पेमेंट सिस्टम सुरू करू शकते. XDA डेव्हलपर्सच्या  (XDA Developers) नवीन अहवालावर विश्वास ठेवला तर, नवीनतम WhatsApp 2.21.23.10 बीटा  वर्जन कोड नोवी इंटीग्रेशन (Novi integration)कडे निर्देश करते, जे जागतिक पेमेंट हस्तांतरण सक्षम करते. 
 
नोव्ही (Novi) सेवा सध्या फक्त यूएस आणि ग्वाटेमालामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे असे मानले जाते की व्हॉट्सअॅप यूएस वापरकर्त्यांसाठी पेमेंट पर्याय जोडण्यावर  काम करत आहे. व्हॉट्सअॅप सध्या फक्त भारत आणि ब्राझीलमध्ये त्यांची पेमेंट सेवा देत आहे. भारतात, ही सेवा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर आधारित आहे, ज्यामुळे वापरकर्ते थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात.
 
Novi हे Meta चे डिजिटल वॉलेट आहे,
हा नवीन शोध WABetaInfo च्या अहवालाला पुष्टी देतो ज्याने Novi सेवेच्या एकत्रीकरणाबद्दल सांगितले होते. ज्यांना नोव्हीबद्दल माहिती नाही, त्यांना सांगायचे झाले तर हे एक डिजिटल वॉलेट आहे.  हे वॉलेट मेटाचे आहे. नुकतेच फेसबुकने आपले नाव बदलून मेटा केले आहे. त्यामुळे तुम्हाला हे समजू शकते की हे फेसबुकचेच डिजिटल वॉलेट आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये  इंटीग्रेट  करण्याची योजना आहे.
 
नोव्हीच्या माध्यमातून विविध देशांतील वापरकर्ते एकमेकांना पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. पण पैसे पाठवण्यासाठी त्यांना पॅक्स डॉलर (Pax Dollar) वापरावे लागेल, जे यूएस डॉलर (US Dollar) चे डिजिटल नाणे आहे. असे म्हटले जात आहे की नोव्हीकडून पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, वापरकर्त्याला प्रथम त्याचे दस्तऐवज अपडेट करावे लागतील आणि त्यांची पडताळणी करावी लागेल. ओळख  वेरीफाईसाठी व्हिडीओ सेल्फीही मागवला जाण्याची शक्यता आहे.