गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (13:16 IST)

WhatsApp फीचर, एकाचवेळी चार डिव्हाइसवर अॅक्सेस

WhatsApp आपल्या युजर्संसाठी नेहमी नवीन फीचर्स आणत असते. कंपनीच्या नवीन फीचर्समध्ये मल्टी डिव्हाइस म्हणजे एकाच अकाउंटला अनेक डिव्हाइसवर अॅक्सेस मिळणार आहे.
 
या फीचरच्या मदतीने एक अकाउंटचा वापर एकाचवेळी अनेक डिव्हाइसेजवर करता येईल. WABetaInfo च्या माहितीनुसार, iOS साठी WhatsApp बीटा 2.21.30.16 मध्ये एक लॉगआउट फीचर दिसले. या फीचर द्वारे एक व्यक्ती विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाइसशी लॉग आउट करू शकणार आहे. हे लिंक्ड डिव्हाइस इंटरफेस मध्ये देण्यात आलेल्या डिलीट अकाउंट पर्यायाला रिप्लेस करू शकतो.
 
रिपोर्टप्रमाणे एकाच अकाउंटला ४ वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये अॅक्सेस केला जाऊ शकतो. ही मर्यादा नंतर वाढवली जाऊ शकते. या फीचरसाठी प्रायमरी डिव्हाइसवर इंटरनेट कनेक्शनची गरज नसणार त्यामुळे लॉग आउट फीचर द्वारे युजर्स अकाउंटला वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये लॉगआउट करु शकतील.