Marathi Biodata Maker

शाओमीने इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली

शनिवार, 25 एप्रिल 2020 (21:03 IST)
इलेक्ट्रिक स्कूटरनंतर शाओमीने आता इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे. आपल्या यूपिन ब्रांडच्या अंतर्गत Himo Z16 (हिमो झेड १६) नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.
 
Xiaomi Youpin HIMO Z16 (शाओमी यूपिन हिमो झेड १६) तयार करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम धातूचा वापर केला गेला आहे आणि या सायकलच्या मागील बाजूस स्विंगआर्म (swingarm) सस्पेंशन देण्यात आलं आहे. हे सस्पेंशन सामान्यत: माउंटन बाइक्स, मोपेड्स आणि मोटारसायकलींमध्ये आढळतं. शिवाय, Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकलचे वजन फक्त २२.५ किलो आहे. यात १६ इंचाची चाके आहेत आणि ही सायकल जास्तीत जास्त १०० किलो भार वाहू शकते.
 
Xiaomi Youpin HIMO Z16 इलेक्ट्रिक सायकल फोल्डेबल आहे. म्हणजेच ती सहजपणे दुमडली जाऊ शकते. सायकल तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुमडली जाऊ शकते – हँडलबार, मध्यम फ्रेम, पेडल. त्यामध्ये मॅग्नेटिक क्लॅप्स आहेत जे सायकल जोडल्यावर पूर्णपणे चिकटल्या जातात, ज्यामुळे ती सहजतेने कुठेही घेऊन जाता येईल. इलेक्ट्रिक मोडमध्ये ५५ किलोमीटरपर्यंत चालते आणि पॉवर मोडमध्ये ८० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या सायकलचा वेग ताशी २५ किमी आहे. या इलेक्ट्रिक सायकलची किंमत $ ३५० आहे (सुमारे २७ हजार रुपये). ही सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागकडून १९ जुलै रोजी मेगा ब्लॉक लागणार

मेक्सिकोमध्ये ७.४ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा देण्यात आला

रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२७ ची दमदार सुरुवात केली; सर्व व्यवसायांनी उत्कृष्ट कार्यप्रदर्शन केले

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली चिरडून नगरपालिकेचे दोन कर्मचारी ठार; परभणी मधील घटना

जिओच्या 5G नेटवर्कचा विस्तार आणखी मजबूत झाला, True5G ग्राहकांची संख्या २८.५ कोटींवर पोहोचली

पुढील लेख
Show comments