मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated :लंडन , शुक्रवार, 27 मे 2016 (17:30 IST)

मोबाइलवर जास्त बोलण्यामुळे झाला मृत्यू!

मोबाईल फोनवर बोलणे जीव घेणारा आहे का? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की मोबाइलमुळे एका व्यक्तीचा जीव गेला. मोबाईल फोनचा जास्त वापर केल्याने ब्रिटनच्या 44 वर्षीय इयान फिलिपचा जीव गेला. हेल्‍थ एग्जिक्‍युटिव इयान रोज आपल्या ब्लॅकबेरी फोनवर सतत  सहा तास बोलत होता. तासातास कॉन्‍फ्रेंसिंगमध्ये राहणे हे त्याच्या कामाचा एक भाग होता. सात वर्षाआधी इयानला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. पण काही वेळापासून डोकेदुखी सुरू झाली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. वेल्‍सच्या युनिव्हर्सिटी दवाखान्यात त्याला भर्ती व्हावे लागले जेथे एमआरआय मशीनमध्ये ब्रेन स्‍केन करण्यात आले तेव्हा माहीत पडले की त्याच्या ब्रेनमध्ये लिंबाच्या आकाराचा ट्यूमर आहे.  

पुढे पहा इयानचा जीव कसा गेला.... 

इयानचे इमर्जेंसी ऑपरेशन करावे लागले. 9 तास चालणार्‍या या ऑपरेशननंतर देखील ट्यूमरला पूर्णपणे काढता आले नाही. इयानला माहित होते की त्याचे जीवन आता थोडेच राहिले आहे. तेव्हा त्याने लोकांना मोबाईल फोन पासून होणार्‍या त्रासांबद्दल लोकांना जागरूक करणे सुरू केले. इयान रग्‍बी खेळाडू देखील राहून चुकला होता. या मिशनमध्ये फुटबॉल प्लेयर ऐरन राम्‍जी आणि वेल्‍सचे रग्‍बी खेळाडू  जॉनथन डेविस आणि रीस प्रीस्‍टलँडचे देखील स्पोर्ट मिळाले.  
 
या दरम्यान इयानने मोबाइलला कानापासून दूर ठेवण्यासाठी एक सोनेरी रंगाचा फोन रिसीवर देखील विकत घेतला. या ट्यूमरमुळे इयानला आपली दीड कोटी वार्षिक उत्पन्न असणारी नोकरी सोडावी लागली. हे ही तेवढेच सत्य आहे की या आकर्षक नोकरीनेच इयानला एक जीवघेणारा आजार दिला.    
 
महत्त्वाचे म्हणजे ही गोष्ट नेहमी विवादात ठरली आहे की मोबाइलचे जास्त उपयोग केल्याने ट्यूमर किंवा कर्क रोगासारखा जीवघेणारा आजार होतो की नाही. काही संशोधकानुसार किमान 3 दशकापासून कर्क रोगाचे प्रकरण वाढल्याचे कुठलेही रिपोर्ट आलेले नाही आहे जेव्हा की तीन दशकांपासून मोबाइलचा प्रयोग फार तीव्र गतीने वाढला आहे.