शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. झारखंड विधानसभा चुनाव 2024
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (09:47 IST)

भाजपच्या प्रचाराची कमान पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात

Amit Shah
झारखंड विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असणार आहे. तसेच यासंदर्भात मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय मंत्री बी.एल.संतोष यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि निवडणूक व्यवस्थापन पथकाची बैठक घेतली. तिकीट वाटपावरुन असंतुष्ट असलेल्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यातील असंतोष दूर केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या प्रत्येक विभागात पंतप्रधान मोदींची निवडणूक सभा घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. झारखंडमध्ये पाच विभाग असून संघटनात्मक दृष्टिकोनातून पक्षाने राज्याची सहा विभागांमध्ये विभागणी केली आहे.  
 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीने निवडणूक प्रचाराची सुरुवात करण्याचे पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पक्षाचे प्रमुख चेहरे आणि रणनीतीकार असल्याचे पक्षाचे नेते सांगतात. 

Edited By- Dhanashri Naik