रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (09:28 IST)

भाजप नेते गणेश नाईक यांचा मुलाचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Sharad Pawar
महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी मुल वडिलांपासून वेगळे होऊन पक्ष बदलत आहे, तर काही ठिकाणी स्थानिक नेते निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षांकडे वळत आहे. भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनी पक्ष बदलला आहे. मंगळवारी भाजपला धक्का बसला. कोकणातील सिंधुदुर्गातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे.
 
नवी मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने संदीप नाईक यांनी सर्वप्रथम पत्र पाठवून पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे बुधवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे सिंधुदुर्ग रत्नागिरीतून काँग्रेसचे खासदार झाले, पण 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Edited By- Dhanashri Naik