मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (08:43 IST)

कारगिल युद्ध : मेंढपाळ्यापासून अन्न वाचविणे पाकला पडले भारी, अश्या प्रकारे कट कारस्थानाचे झाले प्रकटीकरण ...

22 वर्षांपूर्वी कारगिलच्या उंच टेकड्यांमध्ये पाकिस्तान एकदा पुन्हा तोंडघशी पडला होता. भारतीय सैन्याच्या धाडसासमोर त्याचे कट कारस्थान चालू शकले नाही आणि 1999 मध्ये भारतीय सैन्याने पाक सैन्याला पळवून लावून कारगिलात विजयाचा झेंडा फडकविला. तब्बल तीन महिने सुरू असलेल्या या युद्धात 26 जुलै रोजी भारताने शत्रूंच्या हेतूंना अपयशी करून विजय मिळवले. मे च्या सुरुवातीस पाकिस्तान ने गुपचूप आपल्या सैन्याला कारगिलमध्ये एकत्र करणे सुरू केले होते. पाकिस्तानने हळू-हळू आपल्या चौकीची क्षमता वाढवण्यास सुरू केलं आणि भारताला हे कळू दिले नाही. पण त्यांचा एका छोट्याश्या चुकी मुळे त्याचे कट कारस्थान उघडे पडले.
 
8 मे 1999 रोजी पाकिस्तानने एक मोठी चूक केली. पाकच्या सहा नॉर्दन लाइट इंफेंट्रीचे कॅप्टन इफ्तेखार आणि लॉन्स हवालदार अब्दुल हकीम 12 सैन्यासह कारगिलच्या आजम चौकी वर बसलेले होते. त्यांचा लक्षात आले की जवळच भारतातील काही मेंढपाळ आपल्या मेंढऱ्याना चरवत आहे. या मेंढपाळ्याना कैद करावं की नाही, याचा विचार करू लागले. पण त्यापैकी एकाने सल्ला दिला की इथे तर आधीच रेशनची कमतरता आहे. अश्या परिस्थितीत जर आपण यांना बंदिस्त केले तर आपल्या भागामधून त्यांना रेशन द्यावे लागणार. शेवटी हे ठरविले गेले की मेंढपाळ्याना कैद करण्याचे निर्णय योग्य नाही. म्हणून त्यांना जाऊ दिले.
 
हीच एक चूक त्यांना महागात पडली. सुमारे दीड तासानंतर हे मेंढपाळ भारतीय सैन्याच्या जवानांसह परत आले. भारतीय सैन्याच्या जवानांनी दुर्बिणीच्या साहाय्याने तपासणी केली आणि नंतर एका हेलिकॉप्टरने पूर्ण क्षेत्राची तपासणी केली. हाच तो क्षण जेव्हा भारतीय सैन्याला सुगावा लागला की कारगिलच्या टेकड्यांवर पाक सैनिकांनी आपले आधिपत्य केले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे सेवानिवृत्त कर्नल अशफाक हुसेन यांनी कारगिलवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांचा म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी भारताच्या लामा हेलिकॉप्टरने पाकिस्तानच्या चौकीवर गोळीबार केला.
 
आता भारतीय सैन्याला हे समजले होते की पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी झाली आहे. पण त्यांनी प्रथम स्वतःहून आपल्या पातळीवर सोडविण्याचा निर्णय घेतला. या कारणास्तव भारताच्या राजकीय नेतृत्वास याबद्दलची माहिती नंतर मिळाली. एका पत्रकाराला सैन्याच्या सूत्रांनी ही बातमी दिली की सीमेवर काही गोंधळ चालले आहे. ही माहिती संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना मिळताच, त्यांनी तातडीने आपला रशियाचा दौरा रद्द केला. अश्या प्रकारे सरकारला या संदर्भात पहिली माहिती मिळाली.