बॉलीवूडमध्ये सध्या नंबर वन नायिका कोण आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कतरीना येईल. या उत्तराने तुम्ही कदाचित चक्रवाल. पण नीट गृहितक बघितल्यास तुमचाही यावर विश्वास बसेल.
कतरीनाचे वय तिच्या साथीला आहे. ती सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या 'वय झालेल्या' अभिनेत्यांबरोबरही शोभून दिसते आणि नील नितिन मुकेश आणि रणबीर कपूर यांच्याबरोबरही 'जचते'.
बिपाशा बसू, ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा या बॉलीवूड गाजविणार्या सशक्त अभिनेत्री आता वय वाढल्याने हद्दपार होऊ लागल्या आहेत. कॉलेजमध्ये जाणार्या युवा नायकांसोबत त्या शोभत नाहीत. म्हणूनच कतरीनाला यांच्याकडून धोका नाही. राणीसारखी भलेही ती सशक्त अभिनेत्री नसेल. पण स्टार व्हॅल्यू मोठी असल्याने ती चित्रपट यशस्वी करू शकते. शिवाय तिची लोकप्रियता मोठी आहे. राहिला प्रश्न अभिनयाचा ती त्यात सुधारणा करतेच आहे.
जेनेलिया, असीन, सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा या भविष्यात तिला आव्हान देऊ शकतात. पण त्यांची स्टार व्हॅल्यू आज तरी तितकी नाही. त्यामुळे कतरीनाशी स्पर्धेत त्या मागे पडतात.
कतरीनाला खरे आव्हान आहे ते प्रियंका चोप्रा आणि करीना कपूरचे. या दोघीही तिच्याच वयाच्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्या तिच्यापुढे आहेत. पण राजनीती आणि 'अजब प्रेम की गजब कथा' हे दोन चित्रपट कतरीनाच्या अभिनयासाठी ओळखले जाऊ शकतील.
यशस्वीतेचा मुद्दा पाहिला तर प्रियंकाचे जेमतेम दोन चित्रपट हिट ठरलेत. करीनाचे एकामागोमाग एक फ्लॉप ठरलेत. त्या तुलनेत कतरीना दणादण हिट चित्रपट देतेय. त्यामुळेच कतरीना आता नंबर वनला पोहोचली आहे.