मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. कतरीना
Written By वेबदुनिया|

कतरीनाला सतावतेय वडिलांची आठवण

IFM
कतरीना कैफ यशस्वीतेच्या शिखराकडे वाटचाल करत आहे आणि तिच्या पाठिशी तिचे कुटुंबिय आहे. फक्त त्या कुटुंबात तिचे वडिल तेवढे नाहीत. कतरीनाला सध्या दुःख आहे ते हेच. कतरीना आणि तिच्या सात बहिणींना वाढवले ते तिच्या आईने. तिची आई यशस्वी वकिल आहे. शिवाय ती सामाजिक संस्थेसाठी कामही करते. आईनेच आपल्याला वाढवले हे ती कृतज्ञतेने सांगते, पण त्याचवेळी वडिलांचीही आपल्याला आठवण येते हे सांगायला ती विसरत नाही.

कतरीनाचे आई-वडिल लहानपणीच वेगळे झाले. आता त्यांच्यात काहीही संपर्क नाही. कतरीना सांगते, 'एखाद्या कुटुंबात भक्कम आधार असलेले वडिल मी माझ्या मित्रमंडळींमध्ये पहाते तेव्हा मला फार वाईट वाटतं. मला असे वडिल का नाहीत, असे विचार येतात. पण तक्रार करत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याविषयी मी समाधान मानते'.

पण मग आता कतरीना स्टार झाल्याचे कळाल्यानंतर तिचे वडिल आता कुटुंबात परत येणार नाहीत काय? या प्रश्नावर कतरीना नाही असे उत्तर देते. आपले वडिल अतिशय सभ्य गृहस्थ असून ते चांगल्या कुटुंबातून पुढे आलेले आहेत. पण काही प्रश्न कुटुंबात उद्भवल्याने ते दूर गेले. आता मुलीला स्टारडम मिळाले म्हणून परत येणार्‍यातले ते नाहीत, असं ती स्पष्ट करते.