मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. कतरीना
Written By वेबदुनिया|

कतरीनासाठी वैभवाचे वर्ष

- भारती पंडित

IFM
परदेशात जन्मलेल्या कतरीना कैफने हिंदी चित्रपटसृष्‍टीवर आपल्या सौंदर्याने जादू केली आहे. बॉलीवूडला जणू तिच्या 'हॉटेस्ट' अदांचा कैफ चढला आहे. हजारो चाहत्यांच्या हृदयाची धडकन असणार्‍या कतरीनाचा जन्म 16 जुलैला 1984 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता हाँगकाँगमध्ये झाला. सोमवारी जन्मलेल्या कतरीनाची जन्मकुंडली वृश्चिक लग्न व कुंभ राशीची आहे. तिला हे वर्ष यश, किर्ती वैभवाचे जाणार आहे.

कुंडलीतील सर्व ग्रह स्वराशिस्थ असून मि‍त्रगृही आहेत. त्याचा चांगला प्रभाव कतरीनाच्या व्यक्तिमत्वावर पडला आहे. एकूणात ती सर्वगुणसंपन्न अशी आहे.

सप्तममधील उच्च (वृषभ) राहू जन्मस्थानापासून दूर जाऊन कार्यात यश देण्याचे योग निर्माण करत असतो. कुंडलीतील सर्व ग्रह मित्रगृही असल्याने सर्व सुखसंपन्न असल्याचे कोणत्याच गोष्टींचा मोह निर्माण करत नसून उलट उदारपणा, दान-धर्म, दया दर्शविते. गुरु द्वितीयेत स्वराशीचा असून पंचमेश होऊन अभिनयाद्वारा धनार्जन करून परिवाराला सहकार्य करण्याचे पाठबळ देत आहे. तसेच परिवाराला सोबत घेऊन यश संपादन करण्यास प्रेरणादायी ठरत आहे.

धन स्थिति सुदृढ आहे. लग्नेश मंगळ शनिसोबत व्ययमध्ये आहे. त्याने निर्णयक्षमता प्रभावी बनत असून विचार, अस्थिरता व रक्त वाहिन्यांसंबंधित समस्यांचा आधीसूचक आहे. त्यापासून नेहमी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सूर्य, बुध, शुक्र, भाग्यात आहे. सूर्य शुक्र मित्रगृही असल्याने भाग्य उजळण्यात कारणीभूत ठरले आहे. वर्तमानात कतरीनाचा गुरु महादशातून जात असल्याने शुक्रला जुलै 10 पर्यंत वेळ लागणार असून सध्याचा काळ हा तिच्यासाठी अनुकूल आहे. कतरीना एखादा चित्रपट हिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कतरीनाला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाचीही ऑफर येण्याचे योग आहेत. त्याचवेळी मोठे शुक्लकाष्ट तिच्या मागे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्य महादशा 2010 पर्यंत असून कतरीनाच्या यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वृध्दी करणार आहे.

येत्या दोन वर्षात कतरीनाने विवाहाचा विचार करायला काहीच हरकत नाही. एखादा पुरस्कार तिच्या पदरात पडण्‍याचे योग आहेत. कतरीनाला सर्व ग्रहांचे पाठबळ असल्याने यंदाचे वर्ष तिच्यासाठी यश, कीर्तीप्राप्तीचे जाणार आहे.