बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By

माढा लोकसभा निवडणूक 2019

मुख्य लढत : संजय शिंदे (राष्ट्रवादी) विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
 
हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार स्वतः माढा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार होते. मात्र यंदा पहिल्यांदा त्यांचा नातू आणि अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तसेच बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याने पवारया एकाच कुटुंबातून किती उमेदवार रिंगणात उतरवावे? असा प्रश्न विचारत शरद पवारांनी यंदा निवडणूकीतून माघार घेतली आहे.
 
रणजितसिंह निंबाळकर हे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात कार्यरत होते. पण नुकताच  त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि माढा मतदरासंघातून उमेदवारीही देण्यात आली. रणजितसिंह ना. निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव ना. निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. स्वराज उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. १९९६  साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव ना. निंबाळकर यांनी शिवसेना – भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवतसातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले संजय शिंदे यांचे नाव सुरूवातीला भाजपाकडून चर्चेत होते. मात्र मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर संजय शिंदे यांनी त्वरीत राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीनेही त्यांना उमेदवारी जाहीर केली. गेल्या साडेचार वर्षांपासून भाजपाच्या सहकार्यावर संजय शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. संजय शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबीयात राजकीय वाद आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.