1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

चिदंबरम आधी पराभूत मग विजयी

चिदंबरम विजयी
तमिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम पराभूत झाल्याचे वृत्त आधी आले होते. मात्र, नंतर ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

याआधी अभाद्रमुकचे राजा कन्नपन यांचा तीन हजाराने विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, चिदंबरम यांनी फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करून मतांची फेरमोजणी केल्यानंतर चिदंबरम विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.

या निकालानंतर अभाद्रमुकचे व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे मतमोजणीचे काम थांबवावे लागले.
About Writer
भाषा